सामाजिक बांधिलकीतून कदम कुटुंबीयांची वृद्धाश्रमास मदत

शिरोळ (प्रतिनिधी) : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व कामगार प्रतिनिधी अमर उर्फ नाना कदम यांनी आपले वडिल कै डॉ. आनंदराव हरी कदम यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमास धान्य स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

कै डॉ आनंदराव हरी कदम हे शिरोळ परिसरात नावाजलेले पशू वैद्यकीय डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. गेली अनेक वर्षे त्यांनी पशुवैद्यकीय सेवा अविरतपणे स्वीकारून मुक्या प्राण्यांची काळजी घेतली होती. गेल्या वर्षी त्यांचे आकस्मित निधन झाले त्यांचे सुपुत्र अमर उर्फ नाना कदम आणि कदम परिवारातील सदस्यांनी डॉ आनंदराव कदम यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला फाटा देऊन अनाथांना मदत करण्याचे उद्देशाने जानकी वृद्धाश्रमातील अनाथांना आपल्या हातून दोन घास मिळावेत याकरिता धान्य स्वरूपात मदत केली. जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी वृद्धाश्रमास मदत केल्याबद्दल कदम परिवाराचे आभार मानले.

यावेळी अमर उर्फ नाना कदम, सौ पूनम कदम, अपर्णा कदम, आदित्य कदम, दत्तात्रय कदम, सौ प्रा आशालता मगर, प्रा. अनिल मगर, अनिकेत मगर आकांक्षा मगर, खलील कुरणे, अनिल जाधव, दीपक बिसुरे, चंद्रशेखर कलगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

🤙 8080365706