…तर ‘यामुळे’ शहीद झालो असतो : एकनाथ शिंदे

सातारा : बंड करताना थोडा जरी दगाफटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. लोकांच्या आणि देवीच्या आशिर्वादाने सगळं काही सुरळीत झालं, असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे सातारा जिल्ह्यातल्या दरे या आपल्या मूळ गावी आले होते. त्यावेळी त्यांनी पद्मावती मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, बंड करताना थोडा जरी दगाफटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. लोकांच्या आणि देवीच्या आशिर्वादाने सगळं काही सुरळीत झालं.

तसेच, येत्या १५ ऑगस्ट म्हणजेच येत्या ३ दिवसांत मंत्रिमंडळाला खातेवाटप होईल. आमचे सरकार हे डबल इंजिन सरकार असून आम्ही भविष्यात डबल स्पीडने काम करू, असा निर्धारही व्यक्त करत आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय. राज्यात सुगीचे दिवस येतील. विरोधकांना काहीही बोलू द्या. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतंय, असंही त्यांनी सांगितलं.

🤙 8080365706