ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. ते 65 वयाचे होते. गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आत्तापर्यंत त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

मराठी नाट्यक्षेत्रात त्यांनी आपला वेगळाच दबदबा निर्माण केला. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. मात्र प्रदीप पटवर्धन यांच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

प्रदीप पटवर्धन यांनी आत्तापर्यंत नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले. गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठलामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली.

.