कोल्हापूरसह 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समितींची निवडणूक प्रक्रिया रद्द

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील 25 जिल्हा परिषद 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवीन प्रभाग रचना आरक्षण सोडत व मतदार यादी असे सर्व कार्यक्रम रद्द करावा असा आदेश निवडणूक आयोगाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना काढला आहे.


सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा थांबली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार हे सुद्धा अनिश्चित झाले आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या 2017 पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार होतील असा निर्णय घेतला होता.


राज्यात सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुकीची प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली,नांदेड, बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत.

🤙 8080365706