प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : करवीर शिवसेनेची मागणी

गांधीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबन रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (क्र. १०३/२०११) दाखल करण्यात आली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाव्दारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत केंद्र शासनानेही “प्लास्टीक बंदी” चा निर्णय घेतल्याने त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’ हे कायदाविरोधी आहे.


यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पध्दतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा
अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवारप रोखणे कायदा १९५० कलम २ व ५ नुसार तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’ चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे.
राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान रोखण्यासाठी हिंदू जनगागृती समिती ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम गेली १९ वर्षे राबवते. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाच्या वेळी ‘झंडा उँचा रहे हमारा’, असे अभिमानाने म्हटले जाते; पण त्याच वेळी लहान मुलांच्या हट्टापोटी खेळण्यासाठी घेतलेले किंवा वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर अन् नंतर कचराकुंडीत पहायला मिळातात, तसेच ते पायदळी तुडवले जातात. काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे चेहरा रंगवतात. यामुळे स्वातंत्र्यदिनीच राष्ट्रध्वजाचा घोर अवमान होत आहे, याची जाणीवही आपल्याला होत नाही. क्रांतिकारकांनी जो ध्वज भूमीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ला, वेळप्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाची ही क्रूर चेष्टाच नव्हे का? राष्ट्रध्वजाचा मान राखणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरी शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज, मास्क विक्री करतात, ज्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना, संघटना अथवा समूह आदी राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने मा. सत्यराज घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गांधीनगर पोलीस ठाणे यांना देण्यात आले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, हिंदुत्ववादी संघटनेचे शरद माळी,मा. उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, राहुल गिरुले, ग्राहक सेनेचे जितेंद्र कुबडे, विरेंद्र भोपळे, विनोद रोहिडा, दिपक अंकल, बाळासाहेब नलवडे, शिवाजी लोहार, प्रफुल्ल घोरपडे, दिपक फ्रेमवाला, दिपक पोपटाणी, योगेश लोहार, पै. बाबुराव पाटील, कैलास जाधव आदी उपस्थित होते.

🤙 8080365706