हुपरी : हुपरी येथील यादें हुसेन नदाफ पीर मंडळाच्या वतीने आज मोहरम निमित्त महाप्रसाद वाटप करण्याची आदर्शवत परंपरा सुरू करण्यात आली. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अन्नदान करण्याचे हे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सपोनि पंकज गिरी यानी केले.

हुपरी येथे विविध पीर पंजाची स्थापना करण्यात आली आहे. मोहरमच्या शेवटी विसर्जन झाल्यानंतर तीन दिवसाने जारताचा प्रसाद घालण्याची परंपरा आहे.मात्र यावर्षी यादें हुसेन नदाफ पीर मंडळाने पीर पंजे यांची स्थापना करुन अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्याच दिवशी महाप्रसाद वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम केला .याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला .हें कार्य सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र आणण्याचे आदर्शवत कार्य आहे .त्यामुळे नदाफ पीर मंडळ यांच्या कल्पनेतून पवित्र अन्नदान करण्याची प्रथा सुरू झाली हें उल्लेखनीय असल्याचे मत यशवंतराव पाटील नगरसेवक दौलतराव पाटील, भाजपा पक्षप्रतोद रफीक मुल्ला , जवाहरचे संचालक सुरज बेडगे आदींनी व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक संजय गाट , सुदर्शन खाडे , प्रकाश बावचे , गणेश मालवेकर , माजी नगरसेवक अमजद नदाफ , अमेय जाधव , धनंजय महाडिक युवा शक्तीचे बशीर नदाफ यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होते .जुन्या काळातील पैलवान उमरसो नदाफ , हाजी मन्सूर नदाफ , इक्बाल नदाफ , झाकीर नदाफ , मुस्तफा नदाफ , जावेद नदाफ , असिफ नदाफ , सुलतान नदाफ , हुमायुन नदाफ , सुरज नदाफ , मुबारक बागवान , अल्ताफ नदाफ , सोहेल नदाफ , मोहिन नदाफ , तोहीद नदाफ , शाहरुख नदाफ , मुन्ना नदाफ , मेहबूब नदाफ , सुशांत हजारे , सदरेकर, पृथ्वीराज जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी यासाठी कष्ट घेतले. स्वागत असिफ नदाफ यानी केले .मुबारक शेख यानी आभार मानले .
