कोल्हापूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात झाला. टेंबेरोड येथील पक्षाच्या कार्यालय शहर चिटणीस भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाचं औचित्य साधून शेकाप शहर आणि जिल्हा कार्यकारणीच्यावतीनं टेंबेरोड येथील पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या वर्धापनदिनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीष खडके आणि सिटी क्रिमीनल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ॲड प्रमोद कदम यांची निवड झाल्याबद्द्ल पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर विद्यार्थ्यांना पक्षाच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. काँ अतुल दिघे, भाई भरत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला शुभेच्छा दिल्या. प्रा.संजय साठे, प्रा. लिला पाटील यांनी वर्धापनदिनी उपस्थितांना मार्गदशन केलं.

शाहीर रंगराव पाटील, शाहीर सखाराम चौगले यांचा शाहीरीचा बहारदार कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला भाई संभाजी जगदाळे, भाई कुमार जाधव, अतुल दिघे, प्राचार्य जी पी माळी, संग्राम माने, भारत पाटील, अभिजित कदम, राजाराम मगदूम सुभाष सावंत, प्रिया जाधव, योगिता पाटील, प्रमोदिनी जाधव, लता कांदळकर, वैशाली सूर्यवंशी, गीता जाधव, मधुकर हरेल, रुपाली नारे, प्रकाश शिंदे, मनोहर पाटील, सुनंदा मारे, शिवाजी पाटील दमयंती कोडकर, सुभाष सावंत, एल आर पाटील, कावेरी मोटनवर याच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
