शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेच्या तज्ञ संचालकपदी रामदास कोकितकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑप. बँकेच्या तज्ञ संचालकपदी पाटबंधारे विभागाचे रामदास कृष्णा कोकितकर यांची नियुक्ती करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी त्याबाबतचे पत्र कोकितकर यांना दिले.

बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी प्रास्ताविकामध्ये संचालकांची ओळख करुन देऊन तज्ञ संचालक रामदास कोकितकर यांचा बँकेच्याप्रती असणाऱ्या स्नेहाचा उल्लेख करुन, त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा बँकेच्या प्रगतीस हातभार लागणार असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित तज्ञ संचालक कोकितकर यांचा सत्कार बँकेचे संचालक गटनेते रविंद्र पंदारे यांचे हस्ते करणेत आला. निवडीनंतर तज्ञ संचालक कोकितकर यांनी बँकेच्या कामकाजाची संधी प्राप्त करुन दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे आभार मानून बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.


बँकेचे संचालक रोहित बांदिवडेकर यांनी मनोगतामध्ये कोकितकर यांचे अनुभव कौशल्याचा बँकेस निश्चितच फायदा होईल असे नमूद केले.

सदर नियुक्ती सत्कार समारंभावेळी उपाध्यक्ष रमेश घाटगे, संचालक रविंद्र पंदारे, मधुकर पाटील(एम.एस), अतुल जाधव, विलासराव कुरणे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, श्रीमती मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, तज्ञ संचालक दिलीप मिरजे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते.