श्री छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती राजाराम कारखान्यात उत्साहात

कसबा बावडा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात श्री छत्रपती राजाराम महाराज यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आज उत्साहाने साजरा करण्यात आली. श्री. छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, माजी आमदार अमल महाडिक व सर्व संचालक मंडळ तसेच मान्यवरांचे उपस्थितीत करणेत आले.


या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार अमल महाडिक यांनी छ. राजाराम महाराज यांनी सभासद शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या दूरदृष्टीने आपल्या छ.राजाराम साखर कारखान्याचे उभारणी केली. राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या समाजसेवेचा आणि लोकसेवेचा वारसा त्यांनी कोल्हापूरसाठी रस्ते, आरोग्य , विमानसेवा इ. सुविधा उभारणी करून पूर्णत्वास नेला. महाराजांनी रयतेच्या शिक्षणासाठी सध्याचे शिवाजी विद्यापीठ स्थापन करणेसाठी जागेची उपलब्धता करून दिली. तसेच लॉ कॉलेजची उभारणी, विविध उद्योगांची उभारणी, उद्योजकांना दिलेल्या सवलती, इ. त्यांच्या लोककल्याणकारी कार्यांचा उल्लेख करून छ.राजाराम महाराजांच्या प्रती आपण सर्वजण कृतज्ञ आहोत. त्यांनी उभारणी केलेला आपला साखर कारखाना हा भविष्यामध्ये देखील त्यांच्याच सभासदाभिमुख विचाराने मा. आ. महादेवराव महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग भरारी घेईल, असे प्रतिपादन केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी छ. राजाराम महाराज यांना अभिवादन करून कारखान्यामार्फत विविध ऊस विकासाच्या योजना कार्यान्वित आजण त्याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा तसेच कारखान्याच्या दैदिप्यमान वाटचालीस सर्वांनीच सहकार्य करावे असे विनम्र आवाहन केले. यावेळी कारखाना कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी कारखान्याचे संयुक्त विद्यमाने श्री.छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांचेकडून रक्तदान शिबिर, साई कार्डिओलॉजी सेंटर यांचेकडून मोफत आरोग्य शिबीर व कोल्हापूर महापालिका यांचेकडून कोव्हीड 19 बूस्टर डोस ही देण्यात आला. कारखान्याच्या वाटचालीमध्ये योगदान दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि उपस्थित वैद्यकीय अधिकारी व स्टाफचा सत्कार ही यावेळी करणेत आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक प्रकाश ज.चिटणीस यांनी केले. व संचालक हरीश चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.