एकनाथ शिंदेंनी ‘यांच्याकडून’ निष्ठा शिकून घ्यावी : संजय राऊत यांचा सल्ला

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माजी मंत्री लीलाधर डाके यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना हा टोला लगावला आहे.

राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे लीलाधर डाके आणि मनोहर जोशींना भेटले. डाके आणि जोशी हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत कडवट शिवसैनिक म्हणून ठामपणे त्यांच्या पाठिशी राहिले आहेत. मला खात्री आहे की या गोष्टी शिकण्यासाठी अशा कडवट शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्टी आहे.

राऊत म्हणाले, शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यावरून संजय राऊत म्हणाले की, ते कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत. हे मला माहीत नाही. शिवसनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा त्यांना अधिकार काय? हा सगळा पोरखेळ चालला आहे
कोणाला मुख्यमंत्री बनायचं असतं मिळेल त्या मार्गाने. आम्हालाही महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे, पण मिळेल त्या मार्गाने नाही. राज्यात महापूर आहे. लोकं वाहून गेलेत. नुकसान झालंय. गुरं-ढोरं वाहून गेले. दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या पण मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री फिरणार असलतील तर त्यावर टीका करण्यासारखं काही नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

🤙 8080365706