वडणगेत बी. एच. दादाप्रेमी युवक मंचच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडणगे : वडणगे परिसरामध्ये समाज उपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबणाऱ्या तसेच शासकीय योजनेचा लाभ वडणगे ग्रामस्थांना सहजपणे घेता यावा यासाठी बी. एच. दादा प्रेमी युवक मंचच्यावतीने पोस्ट कार्यालयाने फक्त 399 रुपयाची अपघात योजना जाहीर करताच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिलेच आशा प्रकारचे एकाच छताखाली विमा काढणे शिबिर घेण्यात आले.

ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये एकाच छताखाली आधारशी मोबाईल लिंक करून देणे ,ई-मेल आयडी काढणे ,पोस्टाचे खाते काढणे त्याचबरोबर विमा पॉलिसी काढून देणे इत्यादी कामे करून देण्यात आली दिवसभरामध्ये चाललेल्या या शिबिरामध्ये पोस्टाच्या चाळीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे 900 लोकांनी विमा पॉलिसी काढून घेतली.युवक मंचच्या सोईस्कर नियोजनामुळे एकाच छताखाली सर्व यंत्रणा राबविल्यामुळे ग्रामस्थांनी मंचच्या सदस्यांचे कौतुक केले.


यावेळी युवा नेते रविंद्र पाटील, अध्यक्ष युवराज साळोखे, सतीश चेचर, पोस्ट ऑफिसचे अधिकारी अनिल माने तसेच सौ वैशाली कापसे, पोस्टल असिस्टंट पांडूरंग माने, रंगराव मिसाळ, प्रकाश शेलार, सुनिल माने, माणिक जाधव, अमर टिटवे, राजेंद्र धुमाळ, जितेंद्र सावंत, निवास मिसाळ प्रशांत लोखंडे, अमर पाटील, अविनाश जौंदाळ, भिमराव तांबडे, गणेश तांबेकर व मंचचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.