मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय

पुणे : आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले, असा सनसनाटी खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती जो योग्य मेसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेते देवेंद्र फडणवीस होय. पाच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर कोणाला वाटले नव्हेत की पण केंद्राने निर्णय दिला आणि देवेंद्रजींनी तो मानला.