नाशिक(वृत्तसंस्था): एकीकडेआपल्यादेशाच्या राष्ट्रपतीपदाच्याशर्यतीत आदिवासी महिला लढत आहे. त्याच राष्ट्रपदीपदावर विराजमान होतील असा विश्वासही व्यक्त केला जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील परिस्थिती भीषण आहे.

नाशिकच्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील तसेच अदेवाशी नागरिकांना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. या भागात रस्ता नसल्याने चक्क विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी केटीवेअर बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातुन अशा प्रकारे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एकीकडे आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदाच्याशर्यतीत आदिवासी महिला लढत आहे.
नाशिकच्या आदिवासी बहुल भागांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. तर पायवाटादेखील पाण्याखाली गेल्याने या भागातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. शेंयेथद्रीपाडा परिसरात होणाऱ्या महिलांची हाल लक्षात घेत तात्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागात तात्पुरता लोखंडी पूल बांधून दिला होता. मात्र हा पूल देखील आता पाण्याखली गेल्याने येथील नागरिकांचे जीवघेणी कसरत पुन्हा सुरू झाली आहे.
तर दुसरीकडे सुरगाणा तालुक्यातील शाळकरी मुलांची वाट पुराच्या पाण्याने अडवली आहे. या शाळकरी मुलांना दररोज शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट शोधत जीवघेणी कसरत करावी लागत आहे. कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा,