धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीयं!

मुंबई : रेल्वे इंजिन भाड्याने द्या, अशी टिका मध्यंतरी शिवसेनेनं मनसेवर केली होती. आता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी या टीकेची आठवण करून देते मनसेवर निशाणा साधला आहे. रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणून उपदेश देणाऱ्यावर शिवसेनेचे धनुष्यबाण आता डोहाळ जेवणाला भाड्याने देण्याची वेळ आली आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.

मनेसेचा शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा असल्याचं दिसून आलं आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेते लढाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदेनी बंड केल्यानंतर शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला होता. ही राजकीय लढाई कोर्टात जावून पोहोचली होती. सध्या कोर्टात सुरु आहे. शिंदे गटाने एवढ्यावरच न थांबता शिवसेनेच्या धनुष्यबाणावरही हक्क सांगितला आहे. यावर ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या भात्यातून कितीही बाण मारले तरी शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच आहे, असं ते म्हणाले होते.

🤙 9921334545