या वर्षी गणेशा चे जोरात आगमन होणार परवानग्यांसाठी एक खिडकी योजना

मुंबई (वृत्तसंस्था): करोना संसर्गामुळे गेले  दोन वर्षांपासून सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. मात्र आता या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहर्रम हे सण धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या साठी  खिडकी योजना  अंतर्गत राबवीली जाणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंडप तसेच इतर परवानग्या लवकर मिळाव्यात म्हणून एक खिडकी योजना तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानग्या देण्यात याव्या अशा सूचना प्रशासनाला दिले आहेत. गणेश मंडळांकडून नोंदणी शुल्क घेण्यात येऊ नये, हमीपत्रदेखील घेऊ नका, असे पोलिसांना सांगण्यात आले आहे. हा उत्सव साजरा करताना नियमांचा बागुलबुवा नको, असेदेखील अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुंबईतील नियमावली राज्यभर लागू असेल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.