फुलेवाडीतील आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याच्या पोस्ट प्रसारमाध्यमांमध्ये काही दिवसांपासुन फिरत होत्या. रक्ताची हीच गरज ओळखून कै. आनंदा सोमा राणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कसबेकर हॉल, टेंबलाई मंदिर, फुलेवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सीपीआरच्या रक्त पिढीच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुण्यस्मरणा निमित्त एक विधायक उपक्रम राबवावा या हेतूने हा कार्यक्रम संपन्न झाला. विशेष म्हणजे अनेक नातलग, महिलांनी, मित्रपरिवाराने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. जवळपास पन्नास लोकांनी रक्तदान केले. हा उपक्रम पार पाडण्यासाठी वसंत केसरकर, तानाजी गडदे, प्रदीप तानुगडे, दिग्विजय देसाई, अमर पाटील, सुनिल डोंगळे, सुनील जाधव, अविनाश पाटील, रंगराव केसरकर, विलास केसरकर, संदीप बेलेकर, प्रशांत केसरकर, सुनील दळवी, सचिन दळवी, सौरभ केसरकर, दीपक राणे, अनिल पाटील आदींने प्रयत्न केले.