प्रयाग चिखली : पंचगंगेचे पाणी वाढत असताना पावसाचाही जोर वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रयाग चिखली व आंबेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी पहाटेपासून स्थलांतराला प्राधान्य दिले. दिवसभरात सुमारे. ४०-५०टक्के ग्रामस्थांनी सोनतळी तसेच पै पाहुण्यांच्याकडे सुरक्षित स्थळी स्थलांतरण केले. प्रयाग चिखलीच्या बहुतांश नागरिकांनी पुनर्वसन झालेल्या सोनतळी ठिकाणी आसरा घेतला आहे. गुरुवार रात्रीपर्यंत चिखलीतील सुमारे अडीच ते तीन हजार लोकांनी तर आंबेवाडीतील ८०० वर लोकांनी स्थलांतर केले.

चिखलीमध्ये असलेल्या बहुतांशी कुटुंबानी बाहेर राहण्याची स्वतः सोय केलेली आहे. महापूर आला की जनावरांची मोठी अडचण होते गावांमध्ये हजार वर दुभती जनावरे आहेत त्यापैकी बहुतांशी जनावरांचे स्थलांतर सोनतळी व इतर भागात करण्यात आले आहे
गावाला संपर्क साधता येणारे तीनही रस्ते अद्याप खुले आहेत. या रस्त्यावर पुराचे पाणी अजून आलेले नाही. क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे मात्र येथील रस्त्यावर अद्याप पाणी आलेले नाही. शासनाच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत गुरुवारी सकाळी करवीरच्या तहसीलदार शितल मुळे- भांबरे, गट विकास अधिकारी उगले, तालुका आरोग्य अधिकारी जी. डी. नलवडे, पाणीपुरवठा विभागाचे एस. के. बाराटक्के, बांधकाम विभागाचे अमित पाटील, गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, कृषी अधिकारी सुनील रुपनर, तलाठी श्रीकांत नाईक, ग्रामसेवक गिरी गोसावी यांचा समावेश असलेल्या टीमने गावांमध्ये फिरून लोकांना स्थलांतराबाबत आव्हान केले शिवाय ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ स्थलांतरित होत आहे त्या सोनतळी ठिकाणी स्थलांतरित लोकांची व्यवस्था होईल याबाबत पहाणी करून यंत्रणा राबवली. प्रयाग चिखलीच्या स्थलांतरित होणाऱ्या लोकांना सोनतळी येथील समाज मंदिर प्राथमिक शाळा व आश्रम शाळा ठिकाणी सोय करण्यात आली आहे तर आंबेवाडी गावच्या स्थलांतरित लोकांना जुना बुधवार पेठेतील कल्याणी हाॅल. जैन मठ विवेकानंद हायस्कूल या ठिकाणी राहण्याची सोय शासन पातळीवर करण्यात आल्याचे सरपंच सिकंदर मुजावर यांनी सांगितले
दरम्यान अजूनही पुराची कोणतीही गंभीर अध्याप तरी निर्माण झालेली नाही. स्थलांतरासाठी लोक सहकार्य करत असल्याची माहिती चिखलीच्या सरपंच उमा संभाजी पाटील यांनी दिली.