उचगाव : कोणत्याही संकटात सर्वांसाठी धाऊन जाणारी शिवसेना आजपर्यंत सर्वांनी पाहिली आहे.त्यामुळे कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आमच्यासाठी मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिच छत्रछाया आहे. यापुढेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वानुसार सदैव कार्यरत राहू, अशी ग्वाही करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही करवीर शिवसेनेच्या वतीने उचगाव येथील जेष्ठ नागरिकांना छत्रींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मनामनांत घर केले असुन, त्यांच्या पाठीशी जनता सदैव राहिल अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी नेहमी जनतेच्या समस्येसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलनातुन जनतेला न्याय देण्याचे काम करते. आरोग्य, रस्ते, नदी, प्रदूषण, पाणी,वीज तसेच जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाच्या विरोधात नेहमी लढत, नागरिकांना न्याय देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण केले आहे.यापुढेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी झटत राहू अशी ग्वाही ही राजू यादव यांनी दिली.
यावेळी शरद माळी, उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच ग्रा.पं.सदस्या अर्चना करी यांनी अध्यात्माचे महत्व सांगितले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, ग्रा.पं. सदस्या अर्चना करी, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शरद माळी, उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, गावप्रमुख दिपक रेडेकर, कैलास जाधव, युवासेनेचे प्रफुल्ल घोरपडे, शफीक देवळे, बाळासो नलवडे, अजित चव्हाण, अजित पाटील आदी उपस्थित होते.