कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील वाढती कर्करोग रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये कर्करोग उपचार कक्षाची स्थापना करावी अशा मागणीचे निवेदन माजी आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांची मा.आ.अमल महाडिक यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.यावेळी हे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

शासकीय रुग्णालयात प्रभावी उपचार यंत्रणा उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. काहींना शासकीय योजनांचा लाभ मिळतो पण खासगी रुग्णालयात उपचार घेताना अनेकांचे भरमसाठ पैसेही खर्च होतात. याचा विचार करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये अथवा स्वतंत्रपणे तातडीने कर्करोग उपचार कक्ष (कॅन्सर सेंटर) सुरू करण्याबाबत संबंधित खात्यांना आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी अमल महाडिक यांनी केली आहे.
