कोल्हापूर: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर कोल्हापूरमधील छत्रपती ताराराणी चौकामध्ये माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी बोलताना अमल महाडिक म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत होते की, जनमताचा अनादर करून सत्तेत आलेले महाविकास आघाडीचे हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल. आणि आज शेवटी तसेच घडेल हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. खऱ्या अर्थाने जनतेने ज्यांना कौल दिला होता ते भारतीय जनता पक्षाचे सरकार आता पुन्हा एकदा राज्यात जनतेची सेवा करण्यासाठी येत आहे, याचाच आनंदोत्सव आम्ही सर्वजण साजरा करत आहोत.”