शाहू स्वाभिमानी आघाडीच्या विजयात राधानगरी शिक्षक समिती सिंहाचा वाटा उचलणार : बाळासाहेब पवार

राधानगरी (प्रतिनिधी) : शिक्षक बँकेत परिवर्तन होऊन राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पॅनलच्या या ऐतिहासिक विजयात राधानगरी शिक्षक समितीचा सिंहाचा वाटा राहणार, असे ठाम मत बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केले.

राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीच्या राधानगरी तालुका प्रचार मेळाव्यात ते बोलत होते
ते पुढे म्हणाले, शिक्षक बँकेत परिवर्तन करण्यासाठी सर्व संघटना सरसावल्या आहेत .राधानगरी शिक्षक समिती ही पुरोगामी विचारांची पाईक असणारी संघटना आहे. यंदाच्या बँक निवडणुकीत संघटनेच्या सर्व शिलेदारांनी एक जुटीन एक दिलाने राधानगरी तालुका पॕनलच्या प्रचारासाठी पालथा घातला आहे .राधानगरीकरांची ही एकजूट पॕनेलच्या विजयाची वज्रमूठ ठरणार आहे. त्यामुळे समस्त राधानगरीकर हे या विजयाचे शिल्पकार असतील,
यावेळी प्रमोद तौंदकर म्हणाले , शिक्षक बँकेत सभासदांच्या पैशाची उधळपट्टी करून समस्त शिक्षक वर्गाला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बँकेपासून दूर सारण्यासाठी सभासद एकवटले आहेत. शिक्षक बँकेचे कामकाज आदर्श असायला हवे होते पण स्वार्थाने बरबटलेल्या सत्याधारांनी बँकेची लूट केली आहे. बँकेचा लुक बदलणे ,कोअर बँकिंग, निरुपयोगी एटीएम सुविधा ,बँकिंग यावर करोडो रुपये खर्च करून बँक तोट्यात आली आहे .यामुळेच सभासदांचा आक्रोश मतपेटीतून दिसेल आणि परिवर्तन घडेल .
यावेळी राधानगरी सर्वसाधारण गटाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी आपल्या खास शैलीत सध्या लोकप्रिय होत असलेले काय तो डोंगर काय ते जंगल काय ती बँक ही कविता सादर केली.

यावेळी बंडोपंत केळकर, जोतीराम पाटील, रवी पाटील, अर्जुन पाटील, सुनील पाटील, विलास चौगुले यांनी मनोगते व्यक्त केले.

या मेळाव्याला भीमराव रेपे, हरिदास वऱ्णे, प्रकाश कांणकेकर, रवींद्र बोडके, विलास चौगुले, अशोक वाघेरे, जीवन कांबळे, मधुकर मुसळे, मंगेश धनवडे, नारायण आयरे, शाहू चौगुले, संजय चरापले, शिवाजी पाटील, अशोक साबळे, युवराज पाटील, विक्रम वागरे, तुकाराम संघवी, राजू मिटके, आर. के. पाटील, आर. जी. पाटील, आनंदा मोगणे, तानाजी पाटील, भाऊ टिपुगडे, संजय भोपळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुकर मुसळे व विक्रम वाघरे यांनी केले.

🤙 9921334545