कोल्हापूर : विश्वासावर बँक चालते, आणि सभासदांचा विश्वास शिक्षक संघ प्रणित सत्तारुढ गटावर आहे. त्यामुळे शिक्षक संघ सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्चित आहे. शिक्षक संघ व इतर संघटनांचे सहकारी एकसंघपणे प्रचारात असून त्यांनी सत्तारूढ पॅनेल विजयी करण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन शिक्षक नेते दामोदर सुतार यांनी केले. सत्तारुढ पॅनेलच्या जयसिंगपूर येथे आयोजित केलेले मेळाव्यात ते बोलत होते.

पॅनल प्रमुख राजाराम वरुटे म्हणाले, शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी राबणारा आणि त्यांच्या प्रश्नांची निर्गत करणारा फक्त आणि फक्त शिक्षक संघच आहे. कै. माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पश्चात शिक्षक संघटना मजबूत करून शिक्षकांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडून आश्वासनांची पूर्तता केली.या निवडणुकीत सत्तारुढ गटाला सभासदांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. निवडणुकीत विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिक्षक संघाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे.
संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट म्हणाले, स्वार्थासाठी एकत्र आलेले विरोधक कधीच एकत्र राहु शकत नाहीत किंवा सभासदांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत. नेहमी सभासदाभिमुख कारभार करणाऱ्या शिक्षक संघाच्या पाठीशी राहून सत्ताधारी पॅनेलला संधी देऊन विजयाची हॅट्ट्रिक साधावी.
याप्रसंगी माजी अध्यक्ष स्मिता डिग्रजे, दिलीप पाटील,नामदेव रेपे, शिवाजीदादा पाटील, राजू जुगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी रविंद्र नागटिळे, दिलीप बच्चे,तानाजी पोवार, अरुण पाटील, राजमोहन पाटील, चेअरमन डी. के. पाटील उपस्थित होते.
जिल्हा सरचिटणीस उत्तम सुतार यांनी प्रास्ताविक केले.संभाजी कदम यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम सुतार यांनी आभार मानले.