गेले ते कावळे, राहिले ते मावळे; करवीर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत

कोल्हापूर : कितीही संकटे येऊ द्या… कोण कितीही फुटून जाऊ दे.. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत… गेले ते कावळे राहिले ते मावळे… सेनाप्रमुखांची शिकवण सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही. पिढ्यानपिढ्या आम्ही त्यांच्या सोबत राहून, देतील तो आदेश पाळू असा निर्धार आज करवीर शिवसेनेच्यावतीने करण्यात आला.

करवीर शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उचगाव फाटा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भव्य फलक उभारण्यात आला आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान आणि उत्कर्षासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रास साभाळा म्हणून दिले. पुढे शिवसेनाप्रमुखांनीही उद्धव आणि आदित्य यांना महाराष्ट्रास सांभाळा म्हणून दिले. शिवसेनाप्रमुखांचे हे आवाहन आम्ही शब्द म्हणून पाळू,याला तडा जाऊ देणार नाही.तसेच कोणत्याही परिस्थितीत पिढ्यानपिढ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची साथ देऊ, त्यांचा आदेश पाळु अशी ग्वाही करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी यावेळी दिली. यावेळी शिवसैनिकांसह ग्रामस्थांनीही वज्रमूठ करून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचे वचन दिले. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ व “गद्दारांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय” ‘ गेले ते कावळे राहिले ते मावळे” या घोषणांणी परिसर दणाणून सोडला.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,पोपट दांगट, दिपक पाटील, विक्रम चौगुले, शरद माळी, संतोष चौगुले,विनायक जाधव,बाबुराव पाटील, सागर पाटील, बंडू घोरपडे, धनाजी सुतार, सचिन नागटीळक, बाळासाहेब नलवडे, कैलास जाधव,योगेश लोहार, दीपक पोपटाणी, सुनील पारपाणी, किशोर कामरा, शैलेश पवार, दत्ता फराकटे, पवन गजवाणी,राजु राठोड, शशिकांत पाटील, अभिजित थोरात, आनंद जाधव, गौरव धनवडे, सुभान फुलवाले, सूरज मिस्त्री,मोहन आवळे, अनिल माळी, इमाम पठाण, अमीर शेख, मुस्तक पठाण, जुबेर गोलंदाज, दाऊद तसीलदार, तोफिक पठाण, उल्फत मुल्ला, रफिक देवळे, नजीर शेख, मुजाहिद्द खाटीक, शैलेश खाटीक, पप्पू परविक, रज्जक खलीफ, फिरोज खाटीक,अश्फाक खाटीक आदी शिवसैनिक उपस्थित होते.