खिंडार न्हवे तर परिवर्तनाचा एल्गार आहे : मधुकर येसणे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यात खिंडार पडलेले नसून आम्ही त्या मंडळींना दुर्लक्षित केले आहे. एका विचाराने चांगले काम करण्यासाठीच शुद्धीकरण झालेले आहे. त्यामुळे हे खिंडार नसून परिवर्तनाचा एल्गार आहे, असे मत शिक्षक नेते मधुकर येसणे यांनी मांडले. राजर्षी शाहू शिक्षक परिवर्तन आघाडीच्या गडहिंग्लज तालुक्यातील प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

येसणे म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे ते संभ्रम निर्माण करत आहेत. गडहिंग्लज तालुका एकसंघ असून या निवडणूकीत तो निर्णायक भूमिका बजावणार आहे. कारभारी इतिहास घडविण्याची भाषा बोलताहेत मग सहा वर्षे चेअरमन असताना इतिहास घडविताना तुमचे हात कोणी बांधले होते का?

आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह थोरात गटात प्रवेश केलेले सुभाष निकम म्हणाले, मनमानी आणि हुकूमशाही कारभाराला कंटाळून झालेल्या उद्रेकाची सुरुवात गडहिंग्लजमधून झालेली असून येत्या चार दिवसात मोठा भूकंप झालेला दिसेल. आमच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आम्ही पूर्ण ताकदीनिशी राजर्षी शाहू आघाडीत दाखल झालो असून आता सत्तांतर अटळ आहे.

शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौंदकर म्हणाले, आजची विक्रमी उपस्थिती व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून गडहिंग्लजकर उमेदवारीसाठी हट्ट का करत होते याचे उत्तर आज मिळाले. आजची महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय असून या सर्वांच्या जोरावर आपण ही लढाई जिंकणार आहोत. आता सत्तांतर होणारच.

शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आण्‍णासो शिरगावे म्हणाले, मनमानी कारभार हुकूमशाही प्रवृत्ती अन्य कारणास्तव आम्ही नेते सुभाष निकम सरांच्या मार्गदर्शनाखाली थोरात गटात प्रवेश केला असून सर्वशक्तीनिशी राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीत कार्यरत राहणार आहोत .

यावेळी जोतीराम पाटील रवी पाटील मंगेश धनवडे सुनील पाटील नंदकुमार वाईंगडे सुनील एडके भीमराव तराळ बसवराज अंकली यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी सतीश तेली, गणपतराव पाथरवट, दूंडापा खामकर, संभाजी जाधव, विठ्ठल कदम, शंकर साळोखे, दिलीप पाटील नंदकुमार येसादे, मारुती राजगोळे, भीमराव तराळ, आनंद पाटील, श्रीनाथ पाटील, बसवराज अंकली, बाळासाहेब वालीकर, अनिल बागडी, सचिन पाटील, चंद्रकांत जोशी, संभाजी पाटील, मालुताई जाधव, पुष्पा दरेकर, प्रेमा कदम, वंदना दळवी, तुकाराम जाधव, पांडुरंग कापसे, आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन रियाज बागवान, दिनकर खवरे यांनी केले. आभार संजय चाळक यांनी मानले.