मुंबई : सध्या महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली शासकीय गाडी सोडल्याचे समजते. ते आपल्या स्वतःच्या खासगी गाडीने आता प्रवास करत आहेत. तसेच अजित पवारांनी आपली सुरक्षा व्यवस्थादेखील मागे ठेवली आहे.
दरम्यान, सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे चाळीसहून अधिक आमदारांचे संख्याबळ आहे. आज सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे त्यांच्या गटाचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता अजित पवार यांनी शासकीय गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे राजकारण कोणते वळण घेते याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.