कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरीटेज व सांगली मिशन सोसायटीच्यावतीने कसबा बावडा येथील कार्यक्रमात चार दिव्यांग मुलांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
यावेळी क्लबचे सदस्य डॉ. अमित पाटील यांनी सांगली मिशन सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले. सांगली मिशन सोसायटीअंतर्गत आस्था दिव्यांग पुनर्वसन प्रकल्प कोल्हापूर यांच्या माध्यमातून दिव्यांग मुलापर्यंत पोहचून व्हील चेअरसाठी गरजू लाभार्थी शोधून त्यांना याचा लाभ मिळवून दिलेला आहे. तसेच दिव्यांग पुनर्वसन प्रकल्प अत्यंत चांगल्या प्रकारे सांगली मिशन सोसायटी मार्फत चालवला जात असल्याचे सांगितले.
सांगली मिशन सोसायटी सामाजिक आणि विकास कार्य विभागाचे संचालक फादर लीजो जोस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरीटेजचे अध्यक्ष अभिजित वज्रमुष्टी, अमित पुनामिया, अमरदीप पाटील, धनंजय थोरात, प्रकल्प समन्वयक सुप्रिया शिंदे, सचिन अवघडे, रेल्वे चाईल्ड लाइन कोल्हापूरचे समन्वयक अभिजित बोरगे उपस्थित होते .