आता आमदार ‘शिवबंधना’तून मुक्त

मुंबई : शिवसेनेनं आणखी आमदार फुटू नयेत म्हणून उर्वरीत आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मात्र त्यातल्याच काही आमदारांनी काहीना काही कारण काढून हॉटेलमधून पळ काढत होते. आणि तेच आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटत असल्याने शिवसेनेनं ही बंधनं तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आजारी असल्याचा बहाणा करत थेट एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्याचप्रमाणे सदा सरवणकर, दीपक केसरकर, मंगेश कुडाळकर हे आमदारही काहीतरी कारणं देत हॉटेलमधून बाहेर पडले आणि शिंदे गटात सामील झाले. त्यामुळेच आता आपल्या आमदारांवर आपला अंकुश राहिला नसल्याचं लक्षात आल्यावर शिवसेनेनं आता ही बंधनं तोडण्याचा निर्णय घेतला आहे.आता ज्या आमदारांना आपल्या मतदारसंघात जायचं असेल त्यांनी खुशाल जावं अशी सूचना आता शिवसेनेनं आपल्या आमदारांना केल्याचं समजतं आहे. शिवसेनेकडे असलेल्या एकूण ५५ आमदारांपैकी आता जवळपास ४१ आमदार एकनाथ शिंदे यांना गुवाहाटी इथं जाऊन सहभागी झाले आहेत.