मुंबई : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला अखेर यश येत असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार असल्याचा दावा केल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटची घटका मोजत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. आजची ही शेवटची बैठक असण्याची शक्यता आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सर्व मंत्र्यांना देणार अशी माहिती आहे त्यानंतर ते राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.