मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याचा राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे राज्यपालांना आज भेटणार होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते आता नॉट रिचेबल आहेत.

शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे व नाराज आमदारांना घेऊन गुजरातच्या सुरत येथे गेले होते. त्यानंतर त्यांचा पापा आसाम मधील गुवाहाटी येथे गेला. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर शिवसेनेचा मोठा गड त्यांच्याबरोबर असल्याचा त्यांनी दावा केला होता ते आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटून भाजपबरोबर सत्ता स्थापनेचा दावा करणार असे सांगण्यात आले होते. मात्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कोविड पॉझिटिव्ह टेस्टची माहिती कालच झाल्याने बंडखोर आमदारांना सेफ फोनमध्ये ठेवण्यासाठी गुवाहाटी येथे ठेवण्यात आले आहे.
