विधानपरिषदेच्या निवडणुकीत ‘यांची’ विकेट पडणार : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, आणि महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत भाजपला ११ मतांची गरज होती. ती कशी मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, ती मतं मिळाली. महाविकास आघाडीमध्ये बेबनाव आहे, त्याचा फायदा भाजपला होईनर आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना बेबनाव रोखता आला नाही. संजय राऊत हे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्षांवर तुटून पडले आहेत. अपक्षांना स्वत: चं मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील. अडीच वर्ष अपक्षांनी साथ दिली मग ते चांगले होते आणि एका निवडणुकीत त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणं मतदान केलं असेल तर त्यांना बघून घेऊ असं म्हणंण चुकीचं असल्याचे पाटील यांनी सांगितले.

🤙 9921334545