विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पाडण्याचा प्लॅन

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांना पाडण्याचा भाजपचा प्लॅन आहे. तसेच भाजपने घोडेबाजारासाठीच पाचवा उमेदवार उभा केला असल्याचा धक्कादायक आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजप पूर्ण ताकत लावणार आहे. मला तर हे पण माहिती आहे की एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देण्यासाठी भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयार होती, असा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत एमआयएमची दोन मतं काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना दिले जातील. पण उद्या आमची मुंबईत बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असं जलील यांनी सांगितले.

🤙 8080365706