राष्ट्रपतीपदासाठी ‘एवढ्या’ उमेदवारांचे अर्ज दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील ११ नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामधील एक अर्ज बाद करण्यात आला आहे. पूर्ण कागदपत्र सादर केले नाही यामुळे अर्ज बाद केल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यावरुन भाजपच्या गोटात अद्याप चर्चा सुरुच आहे. निवडणूक येत्या १८ जुलै रोजी होणार आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच भाजपकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आला नाही. परंतु 11 विरोधी पक्षातील नेत्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यामध्ये बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांनी अर्ज दाखल केला आहे. सत्ताधारी भाजपमधील नेते राजनाथ सिंह उमेदवाराच्या नावावर एकमत करण्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटी घेत आहेत.

महाराष्ट्रातूनही अर्ज दाखल झाला आहे. सायरा बानो मोहम्मद पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. ते हौशी उमेदवार आहेत असे सांगण्यात येत आहे. एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

निवडणुकीसाठी ११ अर्ज दाखल

1. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू
2. जीवन कुमार मित्तल, दिल्ली
3. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
4. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
5. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू
6. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
7. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली
8. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली
9. लालू प्रसाद यादव, बिहार
10. ए. मणिथन, तामिळनाडू
11. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश