…जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय? : नाना पटोले

मुंबई : आपल्या मतदारसंघातील कामाबाबत जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी उपस्थित केला आहे.

नाना पटोले म्हणाले, जे अपक्ष आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. मतदान ही एक संधी असते. या निमित्ताने आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता येतात. या आमदारांनी जनतेच्या हितासाठी काही गोष्टी मांडल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यामध्ये आमदारांचे काय चुकले. प्रत्येक अपक्ष आणि छोट्या पक्षांशी संपर्क साधला जात आहे. महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी त्यांना विनंती केली जात आहे. काही अपक्ष आणि छोटे पक्ष सुरूवातीपासूनच आमच्यासोबत आहेत. मात्र, कोणाला बोलायची काय गरज आहे. महाविकास आघाडीत ज्या मोठ्या पक्षांसोबत अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत. त्यांच्यासोबत आमदार संवाद साधतील. समाजवादी पार्टी काँग्रेससोबत असल्यामुळे त्यांना आम्ही मतदान करण्याची विनंती करणार आहोत. आमचे आमदार आमच्यासोबत आहेत. ते सुद्धा आघाडीलाच मतदान करतील.

🤙 9921334545