कोल्हापूर : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये यांनी यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे म्हणाले, “कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकले नाही. वर्ष २०२० मध्ये ‘ऑनलाईन’ अधिवेशन घेण्यात आले. या वर्षी प्रत्यक्ष अधिवेशन होत असल्यामुळे देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील २६ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १००० पेक्षा अधिक प्रतिनिर्धीना निमंत्रित करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, तसेच हिंदुत्वनिष्ठ शरद माळी उपस्थित होते.