मल्हार सेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी भगवान हराळे  

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी खुपीरे (त. करवीर) येथील भगवान विठ्ठल हराळे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना धनगर समाज महासंघ, धनगर समाज युवक संघटना यांची संयुक्त बैठक कोल्हापूर येथे पार पडली. यावेळी जिल्हा कार्यकारणीमध्ये नूतन  पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना जिल्हा उपप्रमुख पदी भगवान विठ्ठल हराळे यांची निवड करण्यात आली. तसेच सुरेश शामराव धनगर (आडूर) यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. या निवडीवेळी राज्य मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे, बयाजी शेळके, शहाजी सिध्द, राघु हजारे, छगन नांगरे, बाबुराव रानगे, बाबूराव बोडके, दत्ता बोडके, सर्जेराव हराळे, संभाजी हराळे, धोंडीराम कात्रट, शामराव माने, लिंबाजी हजारे, बंडोपंत बरगाले,अवघडी हराळे, बिरु हराळे, बाळु हराळे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706