विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार निश्चित

मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांची निवड निश्चित करण्यात आली आहे. विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

विधानपरिषदेच्या दहा सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आता २० जूनला विधानपरिषदेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विधान परिषदेसाठी भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा १ आणि १० व्या जागेसाठी पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेवर माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.