कोल्हापूर : १९८३ पासून तंत्रशिक्षणामध्ये अग्रेसर असणाऱ्या न्यू पॉलिटेक्निकने गेल्या ३५ वर्षाहून अधिक काळात अनेक नामांकित उद्योजक घडविले आहेत तसेच राष्ट्रीय स्तरावरील डिपेक्स, थिंकक्वेस्ट अशा विविध प्रकल्प स्पर्धांमध्ये २५ पारीतोषिके व नुकत्याच संप्पन्न झालेल्या लोकराजा राजर्षि शाहू महाराज कृतज्ञता पर्वातील ‘लोकराजा इनोव्हेशन आणि एक्सिबिशन २०२२ या स्पर्धेतील उल्लेखनीय यशामुळेच अशा प्रकारच्या संशोधन केंद्रास मान्यता मिळाल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी केले.
या प्रसंगी न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ” उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांमधे नाविन्यपूर्ण प्रकल्प व संकल्पना जोपासण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने इनोव्हेशन सेलची स्थापना केली आहे. याचा प्राथमिक उद्देश युवा विध्यार्थ्यांना नवीन संकल्पनांसह संशोधन कार्य करण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर करणे हा आहे.”
विध्यार्थ्यांच्या कल्पनांचा आढावा घेऊन त्यासाठी प्री-इन्क्यूबेशन फंक्शनल इकोसिस्टिम स्थापित करण्याचे तंत्रज्ञान विध्यार्थ्यांसाठी अधिक चांगली संज्ञानात्मक क्षमता विकसित करणे, विविध नाविन्यपूर्ण आणि उद्योजगता संबंधित उपक्रमांचे आयोजन करणे, विध्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना ओळखून गौरवासह यशोगाथा तयार करणे, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक यांच्यासमवेत सामायिक व नियमित कार्यशाळा, व्याख्यान, परिसंवाद आयोजित करून नवोदितांसाठी मार्गदर्शक दुवा तयार करणे, इनोव्हेशन पोर्टल तयार करणे, उद्योगांच्या सहभागासह आयडियाथॉन, हॅकथॉन, नवकल्पनांच्या बाबतीत विविध स्पर्धा व लघु-आव्हाने आयोजित करणे, अशी या संशोधन केंद्राची प्रमुख उद्दिष्टे असून प्रा. अश्विनकुमार व्हरामबळे हे या सेन्टरचे प्रेसिडेंट म्हणून काम बघतील अशी माहितीही प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी दिली. कोल्हापूर परिसरात असणाऱ्या शिरोली, गोकुळ शिरगाव सारख्या औद्योगिक वसाहती तसेच नवउद्योगपूरक वातावरण असल्यामुळे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ कोल्हापूरसह जिल्ह्यातील विध्यार्थ्यानी घ्यावा , असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.