मुंबई : भाजपाला त्यांचा स्वत:चा तिसरा उमेदवार उभा करायचाच होता. त्यासाठी संभाजीराजेंची फसवणूक करून त्यांचा ढाली सारखा वापर केला आहे. त्यांना घोडेबाजार करायचाच आहे’, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला टोला लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत राऊत म्हणाले,
संभाजीराजे छत्रपती यांची कशाप्रकारे फसवणुक करण्यात आली हे, यामधून स्पष्ट झाले आहे. भाजपाला त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा करायचाच होता. घोडेबाजार करायचाच आहे. पण त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला.
प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि लढण्याचा अधिकार आहे. मात्र, महाराष्ट्रात कोणी घोडेबादार करून अशा पद्धतीच्या निवडणूका लढणार असतील, तर सरकारचेसुद्धा सर्व घडामोडींवर बारीक लक्ष्य आहे. आम्ही तर आमचा उमेदवार संजय पवार उतरवलेला आहे. त्यामुळे मला आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण खात्री आहे की, विजयासाठी जेवढी मत हवीत त्या मतांचा कोठा शिवसेनेकडे आहे. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. तसेच, महाविकास आघाडीचे आणखी दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उमेदवारही विजयी होतील.