कात्यायनी मंदिरात उद्या शनी जयंतीनिमित्त सप्तसिद्धी होमहवन

बालिंगा : कोल्हापूरपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेली देवतांची देवता, ५२ शक्तिपीठ, विश्‍वातील नवदुर्गा पैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी मंदिरात उद्या सोमवारी नवग्रह शांती (शनी) व सप्तसिद्धी होमहवन आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे अभिषेक, सकाळी नऊ वाजता धार्मिक विधी होम हवन, बारा वाजता आरती, दुपारी साडेबारा वाजता मासिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कात्यायनी देवस्थानचे पुजारी राजू गुरव व स्थानिक सल्लागार उपसमितीचे खजिनदार वसंतराव जांभळे यांनी केले आहे.