शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विधानभवनात उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी हजेरी लावली होती. सहाव्या जागेवर संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर आता संभाजीराजे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी स्तव: आणि कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. मी खात्रीने सांगू शकतो की, यावेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात शंका नाही. भाजपने तीन, चार उमेदवार देवो… आम्ही आमच्या जागा निवडून आणणार. त्यांनी ईडी, सीबीआयचा दबाव टाकून जर वाटत असेल की जागा जिंकू तर त्यांनी प्रयत्न करत रहावे.

🤙 9921334545