निवडणूक बिनविरोध होणार नाही, आता सगळा खेळ अपक्षांवर… : अजित पवार

मुंबई : माझा अंदाज आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही. पक्षाचे अधिकृत मतदार दाखवून मतदान केलं जातं. अपक्षांना दाखवण्याचा अधिकार नाही. मागे गुजरातमध्ये असं काही झालं तेव्हा ती मतं अवैध ठरली गेली. त्यामुळे अपक्षांनीही ज्या पक्षाचे सहयोगी असतील, त्यांना दाखवण्याचं काम केलं असतं, तर निवडणूक बिनविरोध झाली असती. पण आता सगळा खेळ अपक्षांवर असल्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

अजित पवार म्हणाले, काँग्रेस एक, शिवसेना दोन, राष्ट्रवादी एक जागा लढवत आहे. भाजपाच्या दोन जागा सहज निवडून येतील. तिसऱ्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेकडे काही मतं आहेत. गेल्या वेळी शिवसेनेने शरद पवारांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार फौजिया खान यांच्या पाठिशी त्यांची मतं उभी केली होती. तेव्हा पुढच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, असं शरद पवा यांनी शिवसेनेला सांगितलं होतं. त्यानुसार आता शिवसेना जो उमेदवार उभा करेल, त्याच्या पाठिशी आमची मतं असतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपाकडे दोन सदस्य निवडून जातील आणि वर पुन्हा अपक्ष धरून २७-२८ मतं अतिरिक्त राहतील. शिवसेनेकडे देखील काही मतं अतिरिक्त आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी एक, शिवसेना दोन आणि भाजपा दोन असं गणित असूनही निवडणूक होणार असून आता सगळा खेळ अपक्षांवर असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

🤙 8080365706