मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण मिळायला हवे हाच प्रयत्न सरकारचा आहे, अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
शरद पवारसाहेब हे अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि खासदार ब्रिजभूषण हेही सदस्य आहेत त्यामुळे मनसेने जो फोटो ट्वीट केला आहे त्याचा राजकारणाशी काही संबंध लावू नये असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.