जम्मू काश्मीरमध्ये जावळीतील जवान शहीद

सातारा : जम्मू काश्मीरमधील जम्मू सांबा ब्लॉक येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सातारा जिल्ह्यातील जवानाला वीरमरण आलं. बामणोली तर्फ कुडाळ (ता. जावळी) गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय २२) कर्तव्यावर असताना शहिद झाले.

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ या गावचे प्रथमेश संजय पवार हे तीन महिन्यांपूर्वीच भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. वयाच्या 22 व्या वर्षी दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांना वीरमरण आले आहे. १९ मे रोजी रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश गोळी लागून झाले होते. त्यानं रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव उद्या (रविवारी २२ मे) बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार आहे.