कोल्हापूर : छ. संभाजी महाराज जयंती निमित्त पापाची तिकटी येथील राजे संभाजी स्मारक समितीच्यावतीने स्मारक ठिकाणी परिसरातील महिलांनी संभाजी महाराज जन्मकाळ साजरा केला. पाळणा पूजन वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांचे हस्ते झाले.
शिला माजगावकर, मेघा पुरेकर, प्रतिभा माजगावकर, पद्मजा माजगावकर, शर्मिला वाघवेकर, मनीषा ब्रम्हपुरे, सुमन वाघवेकर, पार्वती वाघवेकर, उषा पाटील आदी महिलांनी जन्मकाळ साजरा करताना पाळणा म्हंटला. यावेळी विद्यार्थ्यानी लाठी- काठी आणि लेझिम खेळांची प्रात्यक्षीका सहीत शहरात मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढली. याचे नियोजन महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी पंडीत पवार यानी केले.
जयंतीत्सव पार पाडण्यासाठी राजे संभाजी स्मारक समितीचे ओंकार शिंदे, सौरभ निकम, नितीन ब्रम्हपूरे, चेतन साळोखे, आकाश गुरव, अक्षय ओतारी, स्वप्नील सावंत, रोहीत पंडत, सुभम माळवी, मयुरेश भोसले, विशाल पाटील, सोम देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.