गडमुडशिंगीचा पाणीप्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन

उचगाव : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळयाचा पाणीप्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा करवीर तालुका शिवसेनेने दिला आहे.

गडमुडशिंगी या गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासुन पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून पाणी गळती थांबविण्यासाठी नवीन पाईपलाईन केली आहे. परंतु काही ठिकणी जुन्या पाईपलाईन मधून काही गावांना पाणी देणे चालू आहे. त्याबद्दल ही आम्हाला काही दुमत नाही परंतु गडमुडशिंगीची सध्याची लोकसंख्या वीस हजारच्या घरात आहे. गडमुडशिंगी येथे सहा लाख लिटर पाणी क्षमतेची टाकी आहे. पण ती देखील पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणे हे अवघड झाले आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट असून पाण्यासाठी उद्रेक होण्याची शक्यता आहे. आपण त्याची वाट पाहात आहात का? असा प्रश्न पडतो.  वरील विषयासंदर्भात आपणास लेखी व तोंडी ग्रामपंचायतीने कळवून देखील पाणी म्हणजे जिवन या गोष्टीकडे आपण पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. तरी वरील गोष्टीचे गांभिर्य ओळखुण आपणास या निवेदनाव्दारे सांगु इच्छितो की, गडमुडशिंगी गावासाठी कायमस्वरूपी पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा कसा कराता येईल हे निवेदन मिळताच कार्यवाही करावी अन्यथा जनतेच्या जिव्हाळयाच्या पाणी प्रश्नांसाठी करवीर शिवसेना स्टाईलने पुढील आंदोलन केले जाईल व याची संपुर्ण जबाबदारी आपली राहील याची आपण नोंद घ्यावी.

   या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता नीलकंठ लोकरे यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन गडमुडशिंगीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढील कार्यवाही करू. असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश परमार, पै. बाबुराव पाटील, अजित चव्हाण, मामा फडतरे, भूषण चौगुले, बाळासाहेब नलवडे, प्रशांत समर्थ, विरेंद्र भोपळे, अनिल चौगुले, दिपक पोपटाणी, सुनील पारपाणी आदी उपस्थित होते. तसेच प्रादेशिक गांधीनगर पाणी पुरवठा योजनेचे सुपरवायझर उमेश नरके व मधुकर जांभळे आदी उपस्थित होते.