मुंबई : मंत्रालयासमोर एका दाम्पत्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करणारी व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असून राजू चन्नाप्पा हुलगुंडे असं त्यांच नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजू चन्नाप्पा हुलगुंडे हे गेल्या 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. आपल्यावरील अन्यायाला वाचा फुटावी यासाठी या दाम्पत्याला अनेकवेळा मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागावर त्यांचा आक्षेप होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज दुपारच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.