कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लि. यांच्याकडून त्यांचे तांत्रिक कामकाजाकरीता बालिंगा जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा सोमवार, दि.9 मे 2022 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये पाणी उपसा प्रक्रिया बंद रहाणार आहे. त्यामुळे बालिंगा जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणा-या भागातील सोमवार दिनांक 9 मे 2022 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तर मंगळवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
सोमवारी ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी व फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक परिसर आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजीपेठ परिसर, चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, मिरजकर तिकटी परिसर, भारत डेअरी परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भागांचा समावेश आहे. तर संपूर्ण सी डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, दसरा चौक परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवारपेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, रविवार पेठ परिसर, उमा टॉकीज परिसर, गुजरी परिसर, देवलक्लब या परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. मंगळवार दिनांक 10 मे 2022 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.