कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली; नव्या लेटर बॉम्बने पोलीस दलात धमाका

मुंबई : सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यानंतर आणखी एका लेटर बॉम्बमुळे धमाका उडाला आहे. पिपंरी-चिंचवडमध्ये माजी आयुक्त कृष्ण प्रकाश कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी रुपयांची वसूली गोळा करण्यात आल्याची तक्रार एका पोलीस अधिकाऱ्याने केली आहे. गंभीर आरोप करणारं हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिण्यात आले आहे.

 कृष्ण प्रकाश पिपंरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी- विक्री प्रकरणातून २०० कोटी गोळा करण्यात आल्याचा आरोप सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पत्र लिहून केले आहेत. कनिष्ठ पदावर असल्यामुळे हे करण्यापलिकडे कोणता पर्याय नव्हता असेही त्यांनी यात म्हटलं आहे.

या पत्रामध्ये म्हटलं आहे, की पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्‍यता असून, यापासून मला संरक्षण मिव्ठावे. मी नऊ वर्षापूर्वी फौजदार म्हणून पोलीस दलात भरती झालो आहे. त्यानंतर तीन वर्षापूर्वी माझी नियुक्ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे झाली. मी बराच कालावधी हा नियंत्रण कक्ष येथे काढला. कृष्ण प्रकाश यांची आयुक्त म्हणूत्न नियुक्ती झाल्यावर मी शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात माझी नेमणूक करावी अशी मागणी केली होती. तेव्हा त्यांनी मला सामाजिक सुरक्षा है स्वतंत्र पथक स्थापन करून त्याचे प्रमुखपद दिले. निरीक्षक विठुठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पथक काम करीत असताना आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मनाप्रमाणे काम होत नसल्याचे कारण देत कुबडे यांना हटवून तेथे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांना नेमले. तर मला सामाजिक सुरक्षा पथक प्रमुख आणि वाचक शाखेचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले. वास्तवात कुबडे चांगले काम करीत असतानाही त्यांना बदलण्यात आले होते. या कालावधीत शहरातील अनेक जमिनींच्या खरेदी विक्रीची प्रकरणं हाताळण्यास सांगितले जात होते. यातून मिळणारा पैसा करोड़ो रुपयांमध्ये असल्याने मला है पैसे स्वीकारण्यास सांगितले जात होते. आत्तापर्यंत आयुक्तांसाठी गोळा झालेली रक्कम किमान २०० कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. वास्तवात आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समोर आले. पण मी पदाने कनिष्ठ असल्याने है सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी काम करावी लागायची. या कालावधीत अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे. प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो याची दाट शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात आयुक्त हजर राहून महिलांची कालांतराने माहिती काढली जायची. अशाच काही महिला आयुक्तांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आले. लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केलेले जमिनीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या लोकांनी गोळ्या केलेल्या पैशांच्या संदर्भात मला गोवण्याचा भविष्यात प्रयत्न होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे. चार सहाय्यक आयुक्तांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बोलावण्यात आले होते ते जमिनीचे प्रकरण पाहून मग आयुक्तालयात पाठवत.

या चार ही जणांना शहरातील सर्व व्यवहाराबाबत कल्पना आहे. यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले. मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते. आत्तापर्यंत आलेला पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे. यातील एकाही नव्या पैशांचा वापर मी माझ्या वैक्तिक कामासाठी कधी ही केलेला नाही. हे सगळं मी यापूर्वी पोलीस खात्यातील मुंबईतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिदास मिळाला नाही. त्यामुळं आज अखेर मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे