राजर्षि शाहू गव्हमेंट बँकेतर्फे शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेचेवतीने लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त १०० सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्ण अभिवादन करण्यात आले.

  यावेळी बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे एक नाव नाही, तर एक विचार आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत प्रत्येकाच्या मनात समता, बंधुता रुजवत खऱ्या अर्थाने समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ते रयतेचे राजे होते. राजर्षि शाहू महाराजांच्या प्रेरणेने आमच्या बँकेची स्थापना केली असलेचे नमूद करुन राजर्षि छपत्रती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत ऐतिहासिक परंपरा असलेली आमची बँक १०० वर्षांचा टप्पा पार केला असून बँक १०४ व्या वर्षीही दैदिप्यमान वाटचाल करीत आहे.

   बँकेचे उपाध्यक्ष रमेश घाटगे म्हणाले, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे विचारांचा वारसा जोपासत यापुढेही बँकेचे दैदिप्यमान प्रगतीसाठी कार्यरत राहणार असलेचे नमूद करुन उपस्थित असलेल्या संचालक, सभासद, बँकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.

यावेळी बँकेचे संचालक  संजय  खोत, तज्ञ संचालक विनायक कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश कृ.पाटोळे, बँकेचे सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.