कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी शाहुपूरी पोलिसांचे पथक आज, मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांचा ताबा घेण्यात घेणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी सदावर्ते यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांनी मराठा आणि मागासवर्गीय समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असल्याचे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली होती. काल, सोमवारी त्यांच्या त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. सायंकाळी त्यांना मुंबईतला हलविण्यात आले. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे मुंबईकडे रवाना झाले असून न्यायालयाच्या आदेशानंतर सदावर्तेंचा ताबा घेऊन हे पथक आज रात्री उशिरा पर्यंत कोल्हापुरात दाखल होणार आहे.